क्युनेमा : चित्रपट दर्शन व चर्चासत्र – वृत्तांत

स्टँडर्ड

२२ जानेवारी २०१२ रोजी अस्मिता सप्ताहाचा द्वितीय दिन आम्ही क्युनेमा चित्रपट महोत्सव साजरा करून पार पाडला. कशिश २०११ चे सर्वोत्कृष्ट चित्रपट दाखवले गेले. हरीश अय्यर ने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व प्रत्येक चित्रपटानंतर त्यातील मुद्द्यावर चर्चा घडवून आणली . TISS च्या विद्यार्थ्यांनी चांगला पाठींबा दिला. त्यांनी स्वतःसहभाग घेऊन व सजावट ,ध्वनीव्यवस्था इ. च्या संचालानास मदत केली. आम्हास जागा विनामूल्य उपलब्ध होती. पडदा लावण्यासारख्या इतर कामाना बांधील नसताना तेथील कर्मचारी वर्गाने आम्हाला मदत केली. जागेचा दर्जा उत्तम होता. काही जणांना   अंतराचा प्रश्न जाणवला परंतु हरीशने प्रत्येक चित्रपटाआधी त्याचा उपोद्घात दिला व नंतर त्यातील मुद्द्यावर प्रेक्षकांसोबत चर्चा घडवून आणली . न चर्चिल्या गेलेल्या मुद्द्यांवर संवाद साधण्यासाठी सिनेमा हे उत्तम माध्यम ठरले.प्रेक्षक संवादोत्सुक व चाणाक्ष असल्यामुळे चर्चासत्रास रंग चढला .
यानंतर रेड एफ एम च्या आर जे रोहिणी व TISS चे  प्रा. ब्रीन्डेल डिसुझा प्रोजेक्ट बोलो च्या dvd चे प्रकाशन केले. श्रीधरने आम्ही दाकाहावालेल्या प्रोजेक्ट बोलो च्या चित्राफितीबद्दल सूचना करण्यास व प्रश्न विचारण्यास प्रेक्षकांना आवाहन केले .त्याने आयोजित केलेल्या स्पर्धेत रोहिणीने प्रोजेक्ट बोलो बद्दलच्या सर्वोत्कृष्ट सूचनेस निवडले व विजेत्याला त्याची DVD देण्यात आली.
जेरी जोह्न्सोनने संचालित केलेल्या “प्रसारमाध्यमे व समाज : लैंगिक स्वातंत्र्य ” या विषयावर सायंकाळी चर्चासत्र सुरु झाले. :चर्चासत्रातील सहभागींनी काही विचार प्रवर्तक खाजगी अनुभवांचे कथा केले.

डेबोराह ग्रे यांनी ३ वाहीन्यांसोबत काम केले आहे. समलैंगिक व्यक्ती दर सप्ताहाला त्यांचे  जोडीदार बदलतात असे त्यांच्या सहचार्याचे म्हणणे ”ते तर मी सुद्धा बदलते” असे म्हणून खोडून काढल्याचे त्यांनी नमूद केले.

DNA च्या योगेश पवार यांनी स्वच्छतागृहात एकमेकांना भेटणाऱ्या  समलैंगिक व्यक्तींना छळण्याच्या  पोलिसांच्या कुटील कारवाया उघडकीस आणण्याच्या कार्यक्रमाच्या कल्पनेला थांबवले गेल्याचे सांगितले . या व्हीडीओ मध्ये चित्रित झालेल्या पोलिसाने स्वतःची नोकरी जाण्याच्या भीतीमुळे विनंती केल्यानी ही कल्पना बारगळली .नंतर, योगेशने या व्यक्तीबद्दल DNA मध्ये लेख लिहिला.

खालसा महाविद्यालय येथील प्रा. प्रवेश विश्वनाथ यांनी नमूद केले की त्यांनी समलैन्गिकतेबद्दल बोलताच वर्गात अजूनही भयाण शांतता पसरते, आणी लैंगिकतेच्या मोकळ्या व उघड अभ्यासक्रमाची आवश्यकता असल्याचे सूचित केले.

लैंगिकतेच्या मुद्द्यावर अडेल असणाऱ्या सेन्सर बोर्डाला त्यांचा मुद्दा पटवणे अजूनही फार अवघड जात असल्याचे श्रीधर रंगायन यांनी सांगितले.

हरीश अय्यर यांनी पूर्वग्रहदोषित होमोफोबियाबद्दल भाष्य केले.  जग वाईट असल्याचे आपण कधीतरी गृहीत धरतो ,प्रसारमाध्यमांना प्यादे करतो . त्यांनी प्रेक्षकांना विचारले ” आपण किती वेळा प्रसारमाध्यमाना असे सांगतो की त्यांनी लेख नाही लिहिला तरी चालेल परंतु पदयात्रेस यावे.”  .

२२  जानेवारी ला जेरीचा वाढदिवस असूनही चर्चेचे उत्तम संचालन करत तो घालवणे पसंत केले .जेरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा व धन्यवाद.

”Love Is In The Air” – स्वाभिमान सप्ताहाचा खास वृत्तांत

स्टँडर्ड

कॉमेडी स्टोअर, palladium, फिनिक्स मॉल येथे २१ व २२ जानेवारी रोजी सादर झालेले, कैझाद कोतवाल व विशाल असरानी यांनी दिग्दर्शित केलेले नाटक- “Love is in the Air …. somewhere over the rainbow” हे क्विअर आजादी मुंबई च्या स्वाभिमान सप्ताहाच्या मुकुटात खोवलेला एक मानाचा तुरा च ठरले.
‘I will survive’, ‘vogue’, ‘fever’, ‘take a chance on me’ ‘Born this way’ या सारखी अनेक सुप्रसिद्ध गीते सादर करून विशाल असरानी, सरोष नानावटी, मानसी मुलतानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दर्शकांना मंत्रमुग्ध केले. या सादरीकरणाद्वारे त्यांनी LGBT जनतेने नेहमीच उचलून धरलेल्या ‘ Madonna, Gloria Gaynor, ABBA, Sarah Mclaughlin ‘ यांसारख्या ओजस्वी कलाकारांच्या आवाजाची ताकद च उपस्थितांना दाखवून दिली. हे सारे कलाकार त्यांचा पाठींबा दर्शविण्या साठी प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित असल्याचा भास च लोकांना या आपल्या कलाकारांनी करून दिला.
कलाकारांची विनोदबुद्धी, उत्तम संगीत, रंगमंचावरील झगमगणाऱ्या सोनेरी पडद्याचा झळाळ, आणि त्या पार्श्वभूमीवर नृत्य करणाऱ्या प्रतिभावंत नृत्य-कलाकारांचे सस्मित चेहरे यांनी ती संध्या सोनेरी केली, तसेच उपस्थितांची वाहवा ही मिळवली. शिट्ट्या, टाळ्या व हास्याचा गजर तर कार्यक्रमाची संपूर्ण १२० मिनिटे अव्याहत चालूच होता.
कार्यक्रमाचे नृत्य-दिग्दर्शक ‘लोन्जीनीज फर्नांडीस’ (प्रभृती यांनी ‘slumdog millionaire’ या चित्रपटाचे देखील नृत्य-दिग्दर्शन केले आहे) यांनी स्त्री, पुरुष याच बरोबर इतरलिंगी व्यक्तींच्या प्रीतीची विविध रूपे, आणि असंख्य समीकरणे यांच्या शक्यतांचा नृत्यातून एक सुंदर गोफच विणला.
दर्शकांना सामील करून घेऊन त्यांची चेष्टा-मस्करी करण्यात हि ते मागे राहिले नाहीत. उपस्थितांतील अनेकांना रंगमंचावर बोलावण्यात आले, भिन्न-लिंगी किंवा straight जोड्यांना भेटवस्तू देण्यात आल्या, तर LGBT ‘एकांड्या शिलेदारांशी’ थोडी गोड शाब्दिक लगट करण्यात आली. या मधून ‘प्रत्येक व्यक्तीला प्रेम करण्याचा सारखाच हक्क आहे’ हा संदेश अगदी सहजगत्या, खेळीमेळीने लोकांपर्यंत पोहोचवला गेला. हा म्हणजे दर्शकांसाठी ‘आंधळा मागतो के डोळा, देव देतो दोन डोळे’ असाच अनुभव ठरला. सर्व दर्शकांना QAM साठी उदारहस्ते देणग्या देण्याची अक्षरशः गळ घालण्यात आली, आणि दर्शकांनीही त्याला उस्फूर्त प्रतिसाद दिला. मग आम्ही हि दर्शकांवर आमच्या मधाळ स्मितहास्यांचा वर्षाव केला, आणि त्यांना आमची चिमुकली QAM कार्ड्स देत २८ जानेवारीच्या स्वाभिमान पदयात्रेमध्ये सामील होण्याची गोड विनंती केली.
आयोजक कैझाद कोतवाल आणि महाबानू कोतवाल यांनी मनाचा मोठेपणा दाखवत कार्यक्रमा मध्ये आम्हाला पाठींबा दर्शविणाऱ्या कैक घोषणा केल्या; एवढेच नव्हे तर आमचा संदेश सर्व दर्शकांपर्यंत नीट पोहोचावा यासाठी शेवटचे चार शब्द बोलण्याचीही संधी आम्हाला दिली.
तसेच त्यांनी QAM च्या, उत्साहाची कारंजीच असलेल्या सीबी आणि नम्रता (हे दोघे कार्यक्रमादरम्यान त्यांच्या सीट मध्ये उत्साहाने अक्षरशः उड्या मारत होते!) यांना त्यांच्या २२ जानेवारी च्या कार्यक्रमामध्ये तेथील दर्शकांशी या स्वाभिमान सप्ताहाबद्दल चार शब्द बोलण्यासाठी आमंत्रित केले. कित्येक उत्साही दर्शकांनी QAM ची देणगी-पेटी जड करण्यासाठी आपला खिसा हलका केला.
आम्ही आशा करतो कि महाबानू, कैझाद आणि त्यांची ‘Love is in the Air ‘ ची संपूर्ण टीम आमच्या २८ जानेवारी २०१२ च्या ‘क्विअर आझादी मुंबई: स्वाभिमान पदयात्रे’ मध्येही सामील होईल.

कथ्थक व भरतनाट्यं नृत्य-सोहळा – एक आढावा

स्टँडर्ड

२१ जानेवारीच्या सायंकाळी TISS येथे शास्त्रीय नृत्याचे अविस्मरणीय व आकर्षक सादरीकरण झाले. Colors of India – Through the Eyes of a Dancer, या कार्यक्रमात  निलेश  सिंघ व  अमोल यांचे भरतनाट्यम , सुनील  सुन्कारा व  सौरभ  मसुरकर यांचे  कथ्थक  , सारंग  भाकरे यांचे काव्यवाचन  झाले.
सौरभ व सुनील यांनी वंदन करून सायंकाळीची सुरुवात केली आणि निलेशने शिव सादर केले.    सुनीलने  तीनतालमध्ये  ठुमरी व नटवरी  तसेच सौरभनेसुद्धा तीनतालमध्ये काही  तांत्रिक बारकावे दाखवले . नंतर , सुनीलने  मनाला आल्हाद देणारे असे  अविस्मरणीय ‘राग यमन ’  याचे सादरीकरण केले. निलेशने विलक्षण सुंदर ‘द्रौपदी वस्त्रहरण’ पार पाडले .  दोन संस्कृतींचा मिलाफ व एकतेच्या आत्म्याचे दर्शन कथ्थक व भरतनाट्यम च्या तराण्यामध्ये घडले.सारंग भाकरेने एकांकिकेत मराठी काव्य सादरीकरण करून  तसेच बॉलीवूड मध्ये भरत नाट्यम चे मिश्रण करून अमोलने रसिकांची दाद मिळवली .

नंतर , सुनीलने  ‘संजीनी ’ हे पंडित  बिरजू  महाराजजी यांच्या सुंदर पदान्यासाचे व ‘लगी तुझसे मन कि लगन ’चे सादरीकरण  केले . संध्याकाळीच्या शेवटी  रबिन्द्रनाथ टागोर यांच्या आत्मस्पर्शी, ‘एकला चलो रे ’या काव्यवाचनाने रसिकांच्या भारावले.

लेखक :सौरभ  मसुरकर
स्वैर भाषांतर : अनिकेत

क्यू-नेमा २०१२ – संपूर्ण कार्यक्रम-पत्रिका

स्टँडर्ड

कशिश आंतरराष्ट्रीय क्विअर चित्रपट महोत्सव 

सहर्ष सादर करीत आहे-
क्यू-नेमा 
समलैन्गिकतेचे भान असलेले चित्रपट !
-क्विअर आझादी मुंबई
क्विअर आझादी मुंबई पदयात्रेचे पर्व ४थे
क्यू-नेमा २०१२ ची आकर्षक कार्यक्रम-पत्रिका:
१. चित्रपटांचे सादरीकरण
२. प्रोजेक्ट ‘बोलो’ च्या DVD चे प्रकाशन आणि चित्रपटांचे सादरीकरण
३. परिसंवाद
*************************************************************************************************
भाग- १:
भारतातील सर्वोत्तम क्विअर चित्रपटांच्या सादरीकरणाला आपला भरघोस, housefull प्रतिसाद द्या
‘कशिश-२०११’ चित्रपट महोत्सवातील, रसिकांच्या खास पसंतीस उतरलेल्या चित्रपटांचा आस्वाद घेण्यासाठी क्यू-नेमा आपणांस आमंत्रित करत आहे
***KUSUM: The Flower Bud ***
शुमोना बेनेर्जी या चित्रपटामध्ये सांगताहेत कथा एका ट्रान्सव्हेस्टाईट, वेश्या- व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीची आणि एका straight , बेकार, भावातिरेकी, आत्मघाती विचारसरणी असणाऱ्या इंग्रजी साहित्याच्या प्राध्यापकाची.
आशेचा अंकुर कसा कधी कधी अत्यंत अनपेक्षित जागी उगवून येतो हे अनुभवण्यासाठी अवश्य पहा!
***In The Closed***
Mathew Menacherry , Miriam Chandy व Menacherry यांचा लघु-चित्रपट- ‘In The Closet’ हा एक प्रेमपट आहे- अगदी सुंदर वाईन, लाल गुलाब, कॅनडलस आणि रेशीम यांनी परिपूर्ण!
काही सत्ये ‘Closet ‘ मधून अचानक प्रकाशात येई -पर्यंत उत्सुकता अगदी शिगेला पोहोचते!!
अगदी ६ च मिनिटांत ‘Closet ‘ मधून बाहेर पडणाऱ्या या गोष्टी काय धमाल उडवून देतात हे जाणण्या-साठी अवश्य पहा!
***More than a friend***
देबलीना यांचा हा बंगाली लघु-माहितीपट (इंग्रजी उप-शीर्षकान्सहित) सम-लैंगिक नात्यांबाबत वाढती जागरूकता अधोरेखित करतो.
या मध्ये समाजाच्या विविध स्तरातील व्यक्तींच्या  प्रत्यक्ष आयुष्यातील अनुभव-कथन आणि मुलाखती आहेत.
या विषयाच्या विविध पैलूंचा विस्तृत उहापोह या लघु-माहितीपटात केलेला आहे. अवश्य पहा!
***Amen***
रणदीप भट्टाचार्य आणि जुधाजित यांचा ‘ आमेन’ मनात एक विचार रेंगाळत ठेवून जातो- “मनुष्य आयुष्यात आपले आई-वडील तसाच आपले ‘लैंगिक प्राधान्य (orientation ) स्वतः निवडू शकत नाही.)
हा चित्रपट लैंगिक छळाचा बळी ठरलेल्या आणि त्यातून सावरलेल्या हरीश अय्यर याच्या आयुष्यात डोकावून पाहतो, ज्याच्या वर हा चित्रपट बेतलेला आहे.
***I am a Woman too***
व्ही. रामनाथन यांचा तमिळ लघु-चित्रपट- ‘I Am a Woman too’ (मी हि एक स्त्री च आहे) ‘सेल्वी’ च्या आयुष्याची झलक दाखवतो. या कथेतून हा चित्रपट दर्शकांना एका ट्रान्स जेन्डर व्यक्ती ला कामाच्या जागी सहन कराव्या लागणाऱ्या भेदभावाचे, तिच्या  संघर्षाचे आणि अंतर्गत उलाघालींचे दर्शन घडवतो.
टोकाच्या भेदभावा समोर एखादी व्यक्ती ‘आपण जे आहोत आणि जसे आहोत’ तसे स्वीकारले जाण्या साठी खांद्याला खांदा लावून कशी उभी राहू शकते हे पाहण्या साठी अवश्य पहा!
*****************************************************************************************
भाग २: ‘प्रोजेक्ट बोलो’
उत्साह-मूर्ती रोहिणी रामनाथन (रेडीओ जॉकी: रेड एफ एम) आणि श्रीमती ब्रीनेल डिसोझा (TISS प्रभाग) यांच्या हस्ते प्रोजेक्ट ‘बोलो’ च्या DVD चे अधिकृत प्रकाशन.
अधिक माहिती साठी www.projectbolo.com ला भेट द्या.
*****************************************************************************************

भाग ३: ‘प्रसारमाध्यमे व समाज: ‘Closet ‘ बाहेर’  या विषयावर परिसंवाद 
प्रमुख वक्त्यांमध्ये-

प्रवेश विश्वनाथ
– हे गुरु नानक खालसा महाविद्यालयात ‘प्रसार माध्यमे व व्यवस्थापन’ (mass media and management) चे प्राध्यापक आहेत. ‘चित्रपटांचे परिशीलन’ हा त्यांच्या शिकवण्याच्या विषयांपैकी एक प्रमुख विषय आहे. 
शैक्षणिक क्षेत्र क्विअर प्रश्न्कडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहते हे त्यांच्या कडून जाणून घेणे हा एक संस्मरणीय अनुभव ठरेल.

डेबोरा ग्रे 
– डेबोरा यांना प्रसारमाध्यमांचा अनुभव आहे. CNN IBN , Times Now आणि NEWSx यांसाठी त्यांनी पत्रकार म्हणून काम केले आहे, तसेच दर वर्षी च्या क्विअर आझादी स्वाभिमान पदयात्रेचे वृत्तांत सादरीकरण हि केले आहे. 
 प्रसारमाध्यमे व चित्रपट क्विअर लोकांना ज्या पद्धतीने जनतेसमोर  मांडतात या बाबत त्यांची काही अत्यंत आग्रही मते आहेत. आणि त्या कोणते मुद्दे मांडत आहेत हे पाहण्या साठी अवश्य उपस्थित राहा.

श्रीधर रंगायन
– हमसफर ट्रस्ट चे श्रीधर हे संस्थापक सदस्य आहेत. तसेच ते कशिश आंतरराष्ट्रीय क्विअर चित्रपट महोत्सवाचे महोत्सव दिग्दर्शक आणि ‘Fhashpoint Film Festival for Human Rights’ चे आयोजक हि आहेत.
ते भारतातील क्विअर चित्रपट चळवळीचे उद्गाते आहेत. तुम्ही त्यांना ऐकायलाच हवे. त्यांना ऐकणे हि एक वैचारिक मेजवानी च ठरेल!
हरीश अय्यर 
विविध प्रश्नांवर हरीश यांनी आवाज उठवला आहे. लैंगिक प्राधान्या-संदर्भातील भेदभाव हा त्यातील केवळ एक विषय आहे. प्रसार्माध्यामांमध्ये त्यांची प्रतिमा एक ‘समलैंगिक हक्कांचा कार्यकर्ता’ ,’बाल-हक्कांचा कार्यकर्ता’, ‘सामाजिक कार्यकर्ता’ अशी आहे. त्यांच्या कामाच्या ठिकाणी व समाजात त्यांच्या लैंगिक प्राधान्याबद्दल लोकांना कल्पना  आहे. त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट हि बनवले गेले आहेत.
त्यांची विनोदबुद्धी व त्यांचा आत्मविश्वास ह्या दोन पाहण्या सारख्या गोष्टी आहेत.
जेरी जॉन्सन
जेरी हे मानसशास्त्रज्ञ आहेत. एक ज्ञानसागर च! त्यांना क्विअर लोकांचे प्रश्न व त्यांचे समाजावरील परिणाम यांची चांगली जाण आहे. या प्रश्नांवरचा एक अत्यंत महत्वपूर्ण आवाज असा त्यांचा उल्लेख करता येईल.
जेरी जॉन्सन हे संपूर्ण परिसंवादाचे सूत्रसंचालन करतील. 
 सामील व्हा… ‘Closet ‘ मधून बाहेर पडा आणि  चित्रपटांच्या ‘स्क्रीन’ मध्ये प्रवेश करा
TISS मध्ये (Tata Institute of social sciences),
रविवार,  २२ जानेवारी २०१२ रोजी,
दुपारी २:०० ते संध्याकाळी ७:३० पर्यंत
येण्याचा मार्गासंबंधी व इतर माहितीसाठी संपर्क साधा-
हरीश अय्यर (९८३३१००३४०)
युदा (९६१९०१४३७८)


QAM २०१२ मध्ये सहभागी होण्याचे मार्ग

स्टँडर्ड
क्विअर या संज्ञेत सर्व LGBTI ( लेस्बियन,गे,बायसेक्शुअल,ट्रान्सजेन्डर,इन्टरसेक्स) व हिजडा,कोथी,पंथी इ. घटकांचा समावेश होतो .विभिन्नलींगी नातेसंबंधानाच जपणाऱ्या भारतीय समाजात या लैंगिक अल्पसंख्यांक समुदायाला मान्यता नाही .क्विअर आझादी यात्रा मुंबईमध्ये वार्षिक पदयात्रा स्वरुपात  या घटकांचा समानता हक्काचा मंच , आवाज व अविष्कार आहे.
आपणास २८ जानेवारी २०१२ च्या क्विअर स्वाभिमान पदयात्रेस इच्छा असून काही अकल्पित परिस्थिती मुळे उपस्थित  राहणे शक्य नसेल तरी
आपल्याला तडफ दर्शवण्याची संधी  उपलब्ध आहे .
तुम्ही नेटवर चित्रफित संक्रमित ( अपलोड ) करून पाठींबा देऊ शकता.
विकल्प १ : आपणास फक्त वेबकॅम अथवा कॅमेरा फोन ची आवश्यकता आहे
खालील संहिते ( स्क्रिप्ट ) च्या  नमुन्यानुसार अथवा आपल्या रूपांतराप्रमाणे चित्रफित बनवा आणि फेसबुक / यु ट्यूबवर संक्रमित करा .” माझे नाव (…….) आहे व मी ( संघटना/ठिकाण) येथून आलो/आले आहे .
कोणताही भेदभाव न करता प्रतिष्ठेचे जीवन जगण्याचा हक्क कोणत्याही प्रकारच्या लैंगिकता असलेल्या असलेल्या व्यक्तींना आहे असे मी मानतो/मानते .
मी क्विअर आझादी मुंबई च्या स्वाभिमान पदयात्रेस सुयश चिंततो / चिंतते.”

विकल्प २ : QAM २०१२ अस्मिता सप्ताहामधील प्रसंगांना हजर रहा .

सोबत  दर्शिका जोडत आहोत..

विकल्प ३ :

कृपया संपर्क करा

हरीश  अय्यर . @ +९१९८३३१००३४०  
प्रफुल  बावेजा  @ +९१९८७०२१३८३१
सीबी   माठेन  @ +९१९८६७३९७७४४ 

हे कार्यकर्ते आपल्या पाठिंब्याचे चार शब्द छापुन आणतील अथवा क्विअर समाजाच्या कार्यक्रमात दाखवतील .त्यामुळे २८ जानेवारीला ऑगस्ट  क्रान्ती मैदान ते गिरगाव चौपाटी ..दुपारी ३ वाजता  आमच्यासोबत क्विअर स्वाभिमान पदयात्रेत चालण्यास त्यांना आनंद वाटेल .

आपल्या जीवनामध्ये स्वातंत्र्याचे सप्तरंग आनंद भरोत. 

क्विअर आझादी मुंबईचा TISS येथे शुभारंभ

स्टँडर्ड

सर्वाना सस्नेह आमंत्रण . लैंगिकतेच्या भेदाभावाशिवाय प्रतिष्ठित जीवन जगण्याचा हक्क साजरा करण्यास यावे.मागे नमूद केल्याप्रमाणे २८ मार्च च्या ऑगस्ट  क्रान्ती मैदान येथील मुंबई अस्मिता पदयात्रेस पुर्वगामी ज्ञान व मनोरंजनायुक्त कार्यक्रमांचा सप्ताह आपण करत आहोत.
टाटा इंस्टीट्युट ऑफ सोशल सायन्सेस देवनार येथे मुंबई अस्मिता सप्ताह च्या शुभारंभासाठी आपल्या उपस्थितीचा आम्ही आग्रह करतो .
TISS येथे दुपारी २ वाजता  ‘pictures against prejudice ‘ हे  छायाचित्र प्रदर्शन व  सायंकाळी ५ वाजता कथ्थक व भरतनाट्यं याच्या शास्त्रीय नृत्य सोहळा होईल .
तसेच आपण जर फिनिक्स मिल च्या सानिध्यात असाल तर महाबानू कोतवाल व कैझाद कोतवाल यांचे अस्मिता सप्ताह विशेष नाटक ‘ love is in the air ‘कॉमेडी स्टोर , पलाडीयम , फिनिक्स मिल येथे पाहण्यास विसरू नका .
हार्बर लाईनचे गोवंडी स्टेशन TISS करिता सोयीचे आहे. स्टेशन च्या पूर्व बाजूने TISS अथवा देवनार करिता रिक्षा करावी. रस्ता न सापडल्यास युदाला +९१९६१९०१४३७८ संपर्क करावा.
अधिक माहिती करिता
हरीश अय्यर  @ +९१९८३३१००३४०
प्रफुल बावेजा  @ +९१९८७०२१३८३१
सीबी माठेन  @ +९१९८६७३९७७४४

एक रूढीविरोधी प्रदर्शन .

स्टँडर्ड


गेट ओव्हर इट आयोजित
पूर्वग्रहांच्या विरोधातील छायाचित्रे .
छायाचित्रे, हास्यचित्रे व व्यंगचित्रे
QAM अस्मिता सप्ताहाचा भाग

अस्मितेच्या सप्तरंगांचे लक्षणीय रेखाटन आणि LGBTHIQ  (लेस्बियन,गे, बायसेक्शुअल,ट्रान्सजेन्डर,इंटरसेक्स , क्विअर) समाजाच्या जीवनाचे प्रतिबिंब .

२१ व २२ जानेवारी २०१२
टाटा इंस्टीट्युट ऑफ सोशल सायन्सेस
चेंबूर
अधिक माहितीसाठी संपर्क
team.getoverit@gmail.com

पुण्यामध्ये QAM करीता पोस्टर उपक्रम !

स्टँडर्ड

मुंबई अस्मिता पदयात्रेचा उन्मेष पुण्यावर सुद्धा !
तरुण आणी उत्साही संघ क्विअर कॅम्पस आयोजित ‘ अस्मितेचे रंग ‘ .
तारीख – रविवार २२ जानेवारी २०१२
वेळ – दुपारी १ पासून पुढे
स्थळ – ओपन स्पेस , B  ३०१ , दुसरा मजला
कांचन जंगा इमारत , कांचन गल्ली
लॉ कॉलेज रस्ता .
अधिक माहिती व पत्ता यासाठी संपर्क करा
अक्षय बजाज # +९१८८०६६६८३११

साल्व्हेशन स्टार – मुंबई अस्मिता रजनी २०१२ !

स्टँडर्ड

साल्व्हेशन स्टार – मुंबई अस्मिता रजनी २०१२ !
तारीख – जानेवारी २५ , २०१२
वेळ – ९ ३० पासून पुढे
स्थळ – कुल शेफ कॅफे , थडानी हाउस , ३२९ / A
वरळी गावठाण , वरळी sagar .

आपले दृढ ऐक्य चित्रफिती (व्हिडीओ) मधून दर्शवा .

स्टँडर्ड

आपणास २८ जानेवारी २०१२ च्या क्विअर स्वाभिमान पदयात्रेस इच्छा असून काही अकल्पित परिस्थिती मुळे उपस्थित  राहणे शक्य नसेल तरी …
आपल्याला तडफ दर्शवण्याची संधी  उपलब्ध आहे .
तुम्ही नेटवर चित्रफित संक्रमित ( अपलोड ) करून पाठींबा देऊ शकता.
आपणास फक्त वेबकॅम अथवा कॅमेरा फोन ची आवश्यकता आहे
खालील संहिते ( स्क्रिप्ट ) च्या  नमुन्यानुसार अथवा आपल्या रूपांतराप्रमाणे चित्रफित बनवा आणि फेसबुक / यु ट्यूबवर संक्रमित करा .

” माझे नाव (…….) आहे व मी ( संघटना/ठिकाण) येथून आलो/आले आहे .
कोणताही भेदभाव न करता प्रतिष्ठेचे जीवन जगण्याचा हक्क कोणत्याही प्रकारच्या लैंगिकता असलेल्या असलेल्या व्यक्तींना आहे असे मी मानतो/मानते .
मी क्विअर आझादी मुंबई च्या स्वाभिमान पदयात्रेस सुयश चिंततो / चिंतते.”


फेसबुक वर चित्रफितीमध्ये आम्हाला ‘ QAM mumbai on the video ‘ असे tag करण्यास विसरू नका . आपण इथे प्रतिक्रियेच्या स्वरूपात सुद्धा चित्रफित पाठवू शकता .
लोभ असावा .